समाज माध्यमांमध्ये असत्य, अर्धसत्याचा महापूर
पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई,
आज टेलिव्हिजन, डिजिटल व समाज माध्यमे आली असली तरी देखील वफत्तपत्रांची विश्वसनीयता अधिक आहे. रेडिओ आल्यानंतर दूरचित्रवाणी येण्यास मोठा कालावधी गेला. परंतु अलीकडे नवनवी माध्यमे झपाट्याने येत आहेत. समाज माध्यमांमध्ये आज असत्य व अर्धसत्य माहितीचा महापूर आला आहे. या पुरातून ‘सत्य’ वेगळे करून ते जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्रकारांना केले.
भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसेच बिहार राज्यातील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा, छत्तीसगड व बिहार येथील विविध माध्यम समूहांचे पत्रकार व प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.