For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अॅपलच्या फोल्डेबल फोन स्क्रीनमध्ये त्रुटी?

06:03 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅपलच्या फोल्डेबल फोन स्क्रीनमध्ये त्रुटी
Advertisement

त्रुटी आढळल्यास ग्राहकांना योग्य ती भरपाई देण्याचे आश्वासन

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अॅपलच्या पहिल्या फोल्डेबल फोन, आयफोन ड्युओच्या क्रीनमध्ये समस्या निर्माण झाली आहे. फोनच्या आतील क्रीन फुटल्याच्या आणि तडकल्याच्या तक्रारी येत आहेत. या फोनची किंमत 3 लाख ते 4.5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Advertisement

आयफोन ड्युओमध्ये, हे नुकसान बहुतेकदा त्या ठिकाणी होते जिथे फोन फिरतो (मध्यवर्ती हिंज). बहुतेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, पहिल्यांदा फोन उघडून वापरल्यानंतर क्रीन आपोआप खराब झाली होती. यावर अॅपल कंपनीने  सांगितले की, आयफोन ड्युओच्या काही युनिट्सच्या आतील डिस्प्लेमध्ये समस्या असल्याची त्यांना जाणीव आहे. ही समस्या फोनमधीलच कोणत्यातरी गोष्टीमुळे होत आहे.

वापरकर्त्यांना मोफत बदलून मिळणार

कंपनी ग्राहकांना सल्ला देते की, जर त्यांना त्यांच्या आयफोन ड्युओच्या मुख्य क्रीनमध्ये काही समस्या आढळल्यास, त्यांनी बदलीसाठी तात्काळ अॅपल केअरशी संपर्क साधावा. सर्वात मोठा डिस्प्ले असणारा हा सर्वात महागडा आयफोन समजला जातो. आयफोन ड्युओमध्ये 5.4-इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि आतमध्ये 7.6-इंचाची मुख्य क्रीन आहे, जी आतापर्यंतच्या कोणत्याही आयफोनमधील सर्वात मोठी स्क्रीन आहे.  ड्युओ हा अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन आहे. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 4.50 लाख रुपयांपर्यंत जाते.

Advertisement
Tags :

.