For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Koyna Wildlife Sanctuary | कोयना अभयारण्यात 'बहाव्या'चा लखलखाट; पिवळ्याधमक फुलांनी निसर्गप्रेमींना घातली भुरळ

05:55 PM Apr 20, 2026 IST | NEETA POTDAR
koyna wildlife sanctuary   कोयना अभयारण्यात  बहाव्या चा लखलखाट  पिवळ्याधमक फुलांनी निसर्गप्रेमींना घातली भुरळ
Advertisement

                       कोयना अभयारण्यात बहाव्याच्या फुलांनी नटले निसर्गसौंदर्य

Advertisement

कोयनानगर :कोयना अभयारण्यातील कोयना परिसर विविधतेने नटलेला आहे. सध्या कोयना परिसर अनेक वनस्पतींना आलेल्या फुलोऱ्यामुळे पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यातीलच एक असणारी बहावा ही वनस्पती आकर्षक फुलांनी बहरली असून ती फुले पर्यटकांना व निसर्गप्रेमींना वाढत्या तापमानतही आकर्षित करून मनाला सुखावा देत आहे.

निसर्ग नियमाप्रमाणे परागीकरण होण्यासाठी फुलपाखरे, मधमाशा, मुंगे व कीटक यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध वनस्पती वसंत ऋतूमध्ये फुलत असतात. कोयना अभयारण्यातील कोयना परिसरात तर विविध पक्षी,कोयनानगर पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेला बहावा पर्यटकांना आकर्षित करत आहे,प्राणी, फुले, वनस्पती यासाठी प्रसिद्ध आहेच, या परिसरात पळस वृक्ष आपल्या केशरी फुलांनी सर्वांना आकर्षित करीत असतो. काटे
शेवर गुलाबी फुलांनी, कुड्याची वेल पांढऱ्या शुभ्र फुलांनी, शतावरी ऐवरी रंगाच्या फुलोऱ्याने पर्यटकांना आकर्षित करीत असतात.

Advertisement

सध्या कोयना परिसरात बडावा ही वनस्पती आपल्या पिवळ्या रंगाच्या फुलोऱ्याने बहरली आहे. सध्याच्या वाढत्या तापमानातही पर्यटकांच्या व निसर्गप्रमींच्या मनाला सुखावत आहे. कोयना निसर्गाची पंढरी असल्याने येथील निसर्गाने मुक्त हाताने केलेल्या उधळणीत न्हाऊन जाण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतातच. त्यातच बहावा बहरल्याने कोयनेचे सौंदर्य अधिकच खुलून जात आहे. कोयनेत येणारे पर्यटक बहाव्याच्या फुलाकडे आकर्षित होऊन वाहव्या करीत गर्द पिवळ्या फुलोऱ्याने वाढत्या तापमानातही मनाने सुखावत आनंद व्यक्त करीत आहेत.

Advertisement
Tags :

.