For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाल ओठ असणारा मासा

06:41 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
लाल ओठ असणारा मासा
Advertisement

खोल समुद्रात दडलेल्या असंख्य रहस्यमय जीवांपैकी रेड-लिप्ड बॅटफिश एक आहे. हा मासा केवळ दिसण्यास अत्यंत अजब नसून स्वत:च्या  सवयींमुळे देखील पूर्णपणे यूनिक आहे. जेथे बाकीचे मासे पोहतात, तर हा मासा समुद्रतळावर ‘चालतो’. सर्वात मजेशीर बाब म्हणजे याचे ओठ इतके लाल आहेत की जणू त्याने लिपस्टिक लावली आहे असे वाटते.

Advertisement

रेड-लिप्ड बॅटफिशचे नाव बॅटफिश पडले कारण याचे शीर वटवाघळाप्रमाणे रुंद आणि सपाट असते. हा मुख्यत्वे गालापागोस बेटांच्या आसपास आणि पूर्व प्रशांत महासागरात आढळून येतो. हा 20-40 मीटर खोलवर राहतो. परंतु कधीकधी 100 मीटरपर्यंत खाली जातो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे याचे चालणे आहे. याचे पेक्टोरल अणि पेल्विक फिन्स पायांप्रमाणे मजबूत आहेत. त्यांच्या मदतीने तो समुद्राच्या तळावर चालतो-फिरतो. पोहण्याऐवजी चालणे त्याला ऊर्जा वाचविण्यास मदत करते.

लाल ओठ का?

Advertisement

वैज्ञानिकांनुसार याचे चमकदार लाल ओठ बहुधा प्रजनन आणि संचारासाठी आहेत. खोल पाण्यात प्रकाश कमी असल्याने हा रंग साथीदाराला आकर्षित करण्यास मदत करतो. हे लाल ओठ याला अत्यंत आकर्षक आणि फोटोजेनिक देखील करतात, ज्यामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेड-लिप्ड बॅटफिशच्या डोक्यावर एक छोटासा अवयव असतो, ज्याला इलिसियम म्हटले जाते. याच्या डोक्यावर ल्यूर देखील असतो. हा मासा या ल्यूरला हलवून छोटे मासे, क्रस्टेशियन्स आणि अन्य जीवांना आकर्षित करतो. शिकार जवळ येताच बॅटफिश स्वत:चे तोंड उघडून त्याला गिळकृंत करते. निसर्गाने याला खरोखरच फिशिंग रॉड दिला असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आकार अन् वर्तन

आकार : प्रौढ बॅटफिशची लांबी 35-40 सेंटीमीटरपर्यंत असू शकते.

रंग : शरीर नारिंगी किंवा गुलाबी रंगाचे असते, हा रंग समुद्र तळासोबत लपण्यास मदत करतो.

स्वभाव : हा अत्यंत शांत राहतो आणि अधिक वेगाने चालत नाही. धोका जाणवल्यास फिन्सच्या मदतीने वेगाने पळू शकतो.

 

चर्चेत का?

अलिकडेच डायवर्स आणि अंडरसी व्हिडिओग्राफर्सच्या क्लिप्स व्हायरल झाल्यावर हा मासा चर्चेत आला आहे. लिप्ड बॅटफिश सध्या धोक्यात नाही, परंतु सागरी प्रदूषण, हवामान बदल आणि ओव्हरफिशिंग सागरी जीवांसाठी मोठी समस्या आहे. गालापागोस बेटांना युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ घोषित करण्यात आले आहे. यामुळे या अनोख्या प्रजातींच्या सुरक्षेत मदत होते. बॅटफिश परिवाराच्या अनेक प्रजाती आहेत, परंतु रेड-लिप्ड बॅटफिश सर्वाधिक आकर्षक मानण्यात येते.

Advertisement
Tags :

.