वाळलेल्या पानांसारखा दिसणारा मासा
पाण्यातील सरडा अशी उपमा
सागरी सृष्टी अत्यंत अनोखी असून यात अनेक प्रकारचे जीव आढळून येत असतात. अमेझॉन लीफ फिश हा वाळलेल्या पानांप्रमाणे दिसून येतो. हा चकवा देणाऱ्या माशांपैकी एक आहे. काही लोक याला पाण्यातील सरडा असेही म्हणतात कारण हा स्वत:चा रंगही बदलू शकतो. हा एक क्रूर शिकारी मासा असून तो अत्यंत धोकादायक मानला जातो.
हा मासा ब्राझील, बोलीविया, कोलंबिया, व्हेनेएजुला देशांमध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळून येतो. हा सहजपणे पाण्यात तरंगणाऱ्या पानांची नक्कल करण्यास सक्षम आहे. स्वत:च्या याच वैशिष्ट्याचा वापर हा मासा घात लावून शिकारीवर हल्ला करण्यासाठी करत असतो. हा मासा स्वत:च्या आजूबाजूच्या स्थितीत मिसळून जाण्यासाठी स्वत:चे स्वरुप वेगाने बदलू शकतो. याचे हेच वैशिष्ट्या सर्वात हैराण करणार आहे.
अमेझॉन लीफ फिशचे शास्त्राrय नाव मोनोसिरहस पॉलीकँथस आहे. याला साउथ अमेरिकन लीफ फिश या नावाने देखील ओळखले जाते, जो 3-4 इंचाइतका असू शकतो. याचे आयुर्मान 5-8 वर्षांदरम्यान असते. हा वाळलेल्या पानांप्रमाणे दिसून येत असल्याने याला अमेझॉन लीफ फिश हे नाव मिळाले आहे.
अमेझॉन लीफ फिशचे शरीर चपटे असते आणि याच्या खालाच्या जबड्याच्या अखेरीस फिलामेंट असते, जी पानांच्या देठाप्रमाणे दिसते. याचे छलावरण इतके प्रभावी आहे की तुम्ही याला वाळलेल्या पानांच्या ढिगामधून शोधून काढू शकत नाही. हा स्वत:भोवतीच्या स्थितीत मिसळून जाण्यासाठी सरड्याप्रमाणे रंगही बदलू शकतो. याचे पारदर्शक पंख असतात. हा मासा पिवळ्या रंगापासून करड्या रंगाचा असू शकतो. त्याच्या शरीरावर विशेष खुणा असतात. हा क्रूर शिकारी मासा असून याच्या आकाराच्या तुलनेत याचे तोंड अधिक मोठे आहे. यामुळे हा छोट्या शिकारीचा जिवंत गिळू शकतो.