For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात लागली आग

06:01 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात लागली आग
Advertisement

महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांसमवेत 13 जण होरपळले

Advertisement

वृत्तसंस्था/ उज्जैन

मध्यप्रदेशच्या महाकाल मंदिरात सोमवारी सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग लागली आहे. या दुर्घटनेत 5 पुजारी आणि 4 भाविक होरपळले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळण्यात आल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.  सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Advertisement

सकाळी भस्म आरतीदरम्यान पूजा सुरू असताना आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात 13 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. आग कुठल्या पदार्थांमुळे भडकली याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी दिली आहे. या दुर्घटनेप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त करत जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. याप्रकरणी आपण मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी चर्चा केली आहे. जखमींना सर्व आवश्यक मदत पुरविली जात असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती शाह यांनी दिली आहे.

मुख्य पुजारीही जखमी

या दुर्घटनेत एकूण 14 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 4 जणांना उपचारासाठी इंदोर येथे हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये मुख्य पुजारी संजय गुरु यांचाही समावेश आहे.

या दुर्घटनेप्रकरणी न्यायंदडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपास समिती तीन दिवसांत स्वत:चा अहवाल सोपविणार आहे. दुर्घटनेवेळी मुख्यमंत्री मोहन यादव यांचे पुत्र आणि कन्या देखील महाकाल मंदिरात होती. दोघेही भस्मारतीत सामील होण्यासाठी मंदिरात पोहोचले होते. दोघेही सुखरुप असल्याचे सांगण्या तआले.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जखमींच्या उपचारासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च मध्यप्रदेश सरकार उचलणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यादव यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.