महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शॉपिंग कॉम्प्लेक्समधील आगीत चीनमध्ये 39 ठार

06:31 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

100 हून अधिक जणांना वाचविले

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisement

चीनच्या जिआंगशी प्रांतातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी आग लागली. या दुर्घटनेमध्ये 39 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार जंक फूडच्या स्टॉलमध्ये आगीचा भडका उडाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरून शंभरहून अधिक जणांना वाचविण्यात यश आले आहे. जवळपास तीन तासांच्या मदतकार्यानंतर आग आटोक्मयात आणण्यात आली. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही घटना जिआंगशी प्रांतातील युशुई मार्केटमध्ये घडली. घटनेच्यावेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स तळघरात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article