महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इलेक्ट्रीक बसगाड्या पुरवणाऱ्या कंपनीस कदंबकडून रु.1 कोटीचा दंड

12:53 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : इलेक्ट्रीक बसगाड्या पुरवणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीस कदंब परिवहन महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून रु. 1 कोटीचा दंडही ठोठावला आहे.कंपनीने दिलेल्या मुदतीत बसगाड्या पुरवल्या नाहीत म्हणून ती नोटीस देण्यात आली असून आता दोन ते तीन महिन्यात बसगाड्या मिळतील अशी ग्वाही कंपनीने दिली आहे. सदर कंपनीला 150 इलेक्ट्रीक वाहने पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कदंब महामंडळाने निविदा जारी करून ते कंत्राट दिले होते. त्या कंत्राटानुसार कंपनीने फक्त 56 बसगाड्या पुरवल्या आणि 94 बसगाड्या दिल्याच नाहीत.त्यामुळेच महामंडळाने नोटीस दिली असून लवकरात लवकर उर्वरीत बसगाड्या पुरवण्यास सांगितले आहे तसेच बसगाड्या देण्यात उशीर का झाला? याचे स्पटीकरण मागितले आहे.

Advertisement

कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बसगाड्यांची कमरता असून अनेक मार्गावरील बस बंद आहेत. त्या पुन्हा चालू करण्याचा इरादा असून त्यासाठी 50 डिझेल बसगाड्या घेण्यात येणार आहेत. त्याकरीता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली आहे. त्या ताब्यात मिळाल्यानंतर बंद पडलेल्या आंतरराज्य मार्गावर पुन्हा बसेस सुरू केल्या जातील. पुणे, मुंबई, हुबळी इत्यादी मार्गावरील बस सध्या बंद आहेत. इलेक्ट्रीक बसगाड्या राज्यातील विविध मार्गावर चालतील.शाळेसाठी बसगाड्यांची मागणी असून 15 वर्षे जुन्या झालेल्या सुमारे 50 ते 60 बसगाड्या भंगारात काढण्यात आल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article