For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जवान मंजुनाथ अंबडगट्टी यांना अखेरचा सलाम

11:00 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
जवान मंजुनाथ अंबडगट्टी यांना अखेरचा सलाम
Advertisement

कक्केरी येथे झाले अंत्यसंस्कार

Advertisement

वार्ताहर /नंदगड

कक्केरी येथील जवान मंजुनाथ शिवानंद अंबडगट्टी (वय 35) हे भारतीय सेनेत आर्मिएट इंजिनिअर रेजिमेंटमध्ये गेल्या 16 वर्षांपासून सेवा बजावत होते. दिल्लीमध्ये झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचाराचा उपयोग न झाल्याने सोमवार दि. 27 रोजी त्यांचे निधन झाले. बुधवार दि. 29 रोजी मूळगावी कक्केरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. मंजुनाथ यांच्या निधनाची बातमी कक्केरी गावात समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. दिल्लीहून विमानाने सांबरापर्यंत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर सैन्य दलाच्या वाहनाने कक्केरी गावापर्यंत पार्थिव नेण्यात आले. तेथील प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारात मंजुनाथ यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, खानापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मंजुनाथ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. कुटुंबीयांनी पार्थिव पाहताच एकच हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.