For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींवर येणार चित्रपट

06:07 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉ  श्यामाप्रसाद मुखर्जींवर येणार चित्रपट
Advertisement

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर स्वत:च्या पुढील प्रोजेक्टवरून चर्चेत आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन आणि त्यांचा वारसा मोठ्या पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य ते पेलणार आहेत.  या प्रोजेक्टचे संभाव्य नाव ‘श्यामा-द मिसिंग चॅप्टर“ ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरु होऊ शकते. प्रोजेक्टशी निगडित इतर माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे.

Advertisement

या चित्रपटाच्या निर्मितीत आदित्य कुमार हलवासिया सहभागी आहेत. तर भांडारकर एंटरटेनमेंट आणि एकेएच वेंचर्सकडून याची निर्मिती केली जाणार आहे. भांडारकर स्वत:चा आगामी चित्रपट ‘द वाइव्स ऑफ बॉलिवूड‘चे काम पूर्ण केल्यावर या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत. ऐतिहासिक ड्रामा आणि पॉलिटिकल थ्रिलर असलेला हा चित्रपट डॉ. मुखजी यांच्या जीवनावर आधारित असेल. या चित्रपटाच्या कहाणीत कलकत्ता विद्यापीठातील सर्वात युवा कुलपतीच्या रुपात त्यांची प्रारंभिक कारकीर्द, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा कार्यकाळ आणि अशा वैचारिक मतभेदांना सामील केले जाईल, ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. हा चित्रपट 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना, 1953मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ‘परमिट सिस्टीम“च्या विरोधात त्यांचे अभियान आणि कोठडीत असताना त्यांच्या मृत्यूशी निगडित गोष्टींना दाखविणार आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन पडद्यावर साकारणे मोठे आव्हान आहे. ‘श्यामा“द्वारे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्यायाला प्रामाणिक, संवेदनशीलता आणि एका नव्या दृष्टीकोनासोबत प्रेक्षकांसमोर आणू इच्छितो असे भांडारकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.