परमवीर चक्र विजेत्यावर येतोय चित्रपट
परमवीर चक्र विजेते सैन्याधिकारी अरुण खेत्रपाल यांच्या कहाणीने प्रेरित चित्रपट ‘इक्कीस’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. श्रीराम राघवन यांच्याकडून दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटातील अगस्त्य नंदाचा लुक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये अगस्त्य नंदा हातात बंदुक घेत युद्धभूमीवर शत्रूचा सामना करताना दिसून येतो. इक्कीस या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान आणि मॅडॉक फिल्म्सकडून करण्यात आली आहे. परमवीर चक्र विजेत्या सैन्याधिकाऱ्याची भूमिका अगस्त्यने साकारली आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. ‘इक्कीस’ हा चित्रपट 1971 च्या युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनाने प्रेरित आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा, धर्मेंद्र आणि जयदीप अहलावत हे कलाकार दिसून येणार आहेत. अगस्त्य हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू आहे.