For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजीवड्यात मच्छीमार बोटीला भीषण आग

10:46 AM Jun 23, 2025 IST | Radhika Patil
राजीवड्यात मच्छीमार बोटीला भीषण आग
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

शहरातील राजीवडा येथे किनाऱ्यावर उभ्या करुन ठेवलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग लागल़ी ही घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडल़ी आगीमध्ये बोटीलगत असलेला टेम्पोही जळून खाक झाल़ा सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाह़ी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली असली तरी आगीमध्ये लाखो ऊपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

आसीफ वस्ता व मुजफ्फर वस्ता (ऱा राजीवडा) यांच्या मालकीची ही बोट होत़ी पावसाळा असल्याने वस्ता यांनी आपली मच्छीमार बोट किनाऱ्यावर उभी कऊन ठेवली होत़ी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या बोटीला अचानक आग लागल़ी काही क्षणात आगीचे स्वऊप वाढत गेल्याने स्थानिकांनी तत्काळ या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला दिल़ी त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल़े

Advertisement

बोटीला लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट हवेमध्ये पसऊ लागल़े तसेच या ठिकाणी असलेल्या इतर बोटींनाही धोका निर्माण झाला होत़ा मच्छीमार बोटीसोबतच येथे असलेल्या टेम्पोनेही पेट घेतल़ा सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवल़े आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेतल़ी आग आटोक्यात आणण्यात रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील अधिकारी महेश साळवी, फायरमन नरेश मोहिते, शिवम शिवलकर, अमोल चवेकर, परेश सावंत, अनिश तोडणकर, वाहनचालक सलीम चंदावाले व संकेत पिलणकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावल़ी

Advertisement
Tags :

.