कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनोरंजनाचा महोत्सव ; अपोलो सर्कस बेळगावात!

12:51 PM Aug 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : गेल्या 14 ऑगस्टपासून बहुचर्चित अपोलो सर्कस बेळगावात सीपीएड ग्राउंड येथे सुरू झाला आहे. चमकदार दिवे, बहारदार संगीत, चित्त थरारक खेळ आणि मनोरंजनामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.100 हून अधिक कलाकार असलेल्या या सर्कसमध्ये 40 प्रोफेशनल  आणि अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग आहे, जे 28 हून अधिक चित्तथरारक कृती सादर करतात. प्रत्येक शो दोन तासांचा असून, दररोज सकाळी, संध्याकाळी व रात्री असे तीन खेळ सादर केले जातात. 1000 प्रेक्षकांची बसण्याची क्षमता असलेला वॉटरप्रूफ तंबू आयोजकांनी उभारला आहे. ज्यामुळे प्रेक्षक आरामात सादरीकरणाचा आनंद घेऊ शकतात. अपोलो सर्कस एक उत्कृष्ट, जागतिक दर्जाचा शो देण्यास कटिबद्ध आहे.  पारंपरिक सर्कस आणि आधुनिक कलात्मकतेच्या मिश्रणामुळे हा सर्कस जनतेचे मनोरंजन करेल. बेळगावकरांनी सहकुटुंब या सर्कशीचा आनंद लुटावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक सनील जॉर्ज यांनी केले आहे.

Advertisement

प्रमुख आकर्षण

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article