For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुर्कस्तानला जाणारी फेरीबोट उलटली

06:47 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
तुर्कस्तानला जाणारी फेरीबोट उलटली
Advertisement

 7 ठार, 24 बेपत्ता : बोटीवर चढल्याने 237 प्रवासी बचावले

Advertisement

वृत्तसंस्था/ सायप्रस

तुर्कस्तानला जाणारी एक फेरी बोट रविवारी भूमध्य समुद्रात उलटली. ही फेरी युरोपातील देश सायप्रसच्या उत्तर किनाऱ्यावरून जवळपास 300 प्रवाशांना घेऊन निघाली होती. तुर्कीच्या प्रसारमाध्यमांनुसार, या अपघातात किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 237 जणांना वाचवण्यात आल्याचे उत्तर सायप्रसचे पंतप्रधान उनाल उस्ताद यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी उलटलेल्या बोटीवर चढून आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. इतर 24 जणांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

Advertisement

तुर्कीच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात उत्तर सायप्रसच्या किनाऱ्यापासून सुमारे 7.5 किलोमीटर अंतरावर झाला. कॅटामरान-श्रेणीची फेरी मेर्सिन प्रांतातील ताशुकचू या तुर्की बंदराकडे जात होती. ती उत्तर सायप्रसमधील किरेनिया बंदरातून निघाली होती. प्रवासादरम्यान खराब हवामान, जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे फेरीबोट उलटल्याचे सांगण्यात आले. तथापि, फेरीबोटीमधील गर्दीमुळे ही दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.