महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगलीत पन्नास हजाराची लाच घेताना हवालदार महिलेस रंगेहाथ पकडले

05:34 PM Dec 18, 2024 IST | Radhika Patil
A female constable was caught red-handed while accepting a bribe of fifty thousand in Sangli.
Advertisement

सांगली :

Advertisement

फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार श्रीमती मनिषा नितीन कोंगनोळीकर - भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. बुधवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

Advertisement

विश्रामबाग पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असणाऱ्या एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कोंगनोळीकर यांनी एकास पन्नास हजारांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. तत्पूर्वी त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. त्याच्याकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article