For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी मिनी महोत्सवात कार्यक्रमांची मेजवानी

02:27 PM Dec 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी मिनी महोत्सवात कार्यक्रमांची मेजवानी
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सावंतवाडी शहरामध्ये चार वर्षानंतर शहरवासीयांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला सुंदरवाडी मिनी महोत्सव दिनांक 27 ते 31 डिसेंबरला सावंतवाडीत रंगणार आहे . या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व दीपक भाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे . विविध पदार्थांचे फूडस्टॉल व घरगुती वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. दिनांक 27 डिसेंबरला बाल गट व खुला गट यांच्यामध्ये जिल्हास्तरीय सोलो डान्स ही रोमांचक स्पर्धा होणार आहे, तर 28 डिसेंबरला ओंकार कलामंच यांचा सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच 29 डिसेंबर रोजी प्रणाली कासले निर्मित " लावण्यखणी" हा कार्यक्रम होणार आहे. 30 डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब यांचा इनरव्हील ब्युटीक्वीन स्पर्धा होणार आहे. तर शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला अक्षता सावंत यांचा रोलर्स म्युझिक नाईट ऑर्केस्ट्रा होणार आहे. तरी सावंतवाडी शहरातील रसिक प्रेक्षकांनी या रंगबहार कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी केले आहे. स्टॉल व स्पर्धेसाठी रवी जाधव यांच्याशी संपर्क साधा :- 9405264027

Advertisement
Advertisement
Tags :

.