महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनगोळ येथील शेतकऱ्याचा शेतीकाम करताना हृदयविकाराने मृत्यू

10:35 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : अनगोळ बाबले गल्ली येथील शेतकरी गजानन परशराम सोमणाचे (वय 62) हे  शेतात मशागतीची कामे सुरू असताना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्क्याने खाली कोसळले. तेंव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी लागलीच त्यांना खासगी ऊग्णालयात दाखल केले. पण उपचाराचा उपयोग न होता त्यांचे  निधन झाले. गजानन सोमणाचे हे रघुनाथ पेठ बाबले गल्ली येथील ज्येष्ठ पंच होते. तसेच म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. रघुनाथ पेठ अनगोळ येथील हनुमान मंदिर मठ व बाबले गल्ली येथील दत्त मंदिर ट्रस्ट कमिटीचे सदस्य होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article