महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव टेम्पोची धडक बसून कल्लेहोळ क्रॉसवर शेतकऱ्याचा मृत्यू

11:18 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : भरधाव टेम्पोची मोटारसायकलला धडक बसून मूळचे तुडये, ता. चंदगड व सध्या राहणारा बेटगेरी, ता. खानापूर येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी कल्लेहोळ क्रॉसजवळ हा अपघात घडला आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रवळू रामलिंग मोहिते (वय 48) रा. बेटगेरी, ता. खानापूर असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. इस्कॉनचे सदस्य चाळोबा मोहिते यांचे ते वडील होत. सोमवारी मळवीवाडी येथे एका लग्न समारंभात भाग घेऊन ते मोटारसायकलवरून बेळगावच्या दिशेने येत होते. त्यावेळी कल्लेहोळला जाणाऱ्या गुड्स टेम्पोची धडक बसून ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रवळू यांना इस्पितळात हलविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका पोहोचण्याआधीच याचवेळी या मार्गावरून जाणारा त्यांचा मुलगा अमोल याने अपघातात वडील जखमी झाल्याचे पाहिले. आपला मित्र प्रदीपच्या मदतीने मोटारसायकलवर बसवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आणले. अमोल व प्रदीप हे दोघे मोटारसायकलवरून जोतिबा डोंगराकडे निघाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराचा उपयोग न होता दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम., साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. के. परसन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article