For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनावट बिल बनविण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

06:36 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बनावट बिल बनविण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement

चौघांना अटक : 1,464 कोटी रुपयांचे फसवे व्यवहार झाल्याचा आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

आर्थिक गुन्ह्यांविऊद्धच्या कारवाईत कर्नाटक व्यावसायिक कर खात्याच्या अंमलबजावणी शाखेने (दक्षिण विभाग) आंतरराज्य बनावट बिल बनवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. एद्दला प्रताप, रेवती, इरबाज अहमद, नफीज अहमद अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये पसरलेल्या या रॅकेटमध्ये 1,464 कोटी ऊपयांचे फसवे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

Advertisement

सिमेंट, लोखंड आणि स्टीलसारख्या बांधकाम साहित्याचा समावेश असलेल्या एका अत्याधुनिक ऑपरेशनचा पर्दाफाश झाला आहे. या साहित्याचा वापर वस्तूंची प्रत्यक्ष हालचाल न करता सुमारे 355 कोटी ऊपयांचे इनपुट टॅक्स व्रेडिट (आयटीसी) खोटे दावे करण्यासह हस्तांतरित करण्यासाठी केला जात होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपींनी फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून अनेक जीएसटी नोंदणी मिळवल्या होत्या. बनावट भाडे करार आणि बनावट कर भरलेल्या पावत्या, घरमालक आणि भाडेकरूंच्या बनावट स्वाक्षऱ्या, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मिळवलेले स्टॅम्प पेपर आणि बनावट नोटरी साक्षांकनांचा वापर त्यांनी आपल्या  व्यवहारांसाठी केला आहे.

या शेल कंपन्यांद्वारे आयटीसी प्रसारित झाल्यानंतर, नोंदणी स्वेच्छेने रद्द करण्यात आल्या. खात्याअंतर्गत नॉन-टॅक्सपेअर (एनजीटीपी) मॉड्यूलद्वारे हे आढळून आले. सुधारित जीएसटी सिस्टम विश्लेषण आणि बॅक ऑफिसमधून आयपी अॅडेस टेल्सच्या टेसिंगद्वारे, तपासकर्त्यांनी असामान्य इनव्हॉइसिंग पॅटर्न आणि वर्तुळाकार आयटीसी प्रवाह ओळखले. त्यानुसार छापे टाकण्यात आले.

बेंगळूर, चेन्नई, वेल्लोर आणि पेरनमपट्टू येथे एकाच वेळी शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांनी 24 मोबाईल फोन, 51 सिम कार्ड, विविध कंपन्यांचे रबर स्टॅम्प आणि अनेक बँक स्टेटमेंट जप्त केले.

Advertisement
Tags :

.