कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुण्यात एका मद्यधुंद महिलेचा धिंगाणा

11:46 AM Feb 15, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

वानवडीतील घटना, नागरिक झाले त्रस्त
पोलिसांकडून करवाईची मागणी
पुणे
पुण्यातील वानवडी येथील जगताप चौकात एका मद्यधुंद महिलेने धिंगाणा घातल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. ही महिला मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत होती. या प्रकारामुळे परिसरात मोठी गर्दी जमा झाली. वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
यासंबंधी अधिक माहिती अशी, पुणे स्टेशन परिसरातील एका पबमधून पार्टी करून बाहेर पडली. यावेळी ती मद्याच्या प्रभावाखाली असल्याने रस्त्यावरच गोंधळ घालू लागली. तिच्या या वर्तनामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले. काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
या प्रकरणाची माहिती मिळताच माहिती अधिकार कार्यकर्ते ललित ससाणे यांनी वानवडी पोलीस स्टेशनला फोनवरून तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्वरीत कारवाई केली.

Advertisement

"या प्रकारामुळे वानवडी भागातील नागरिक त्रस्त झाले. यावेळी नागरिकांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे गैरवर्तन रोखण्यासाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या महिलेच्या वर्तनामुळे संपूर्ण चौकात गोंधळ उडाला होता. लोकांची गैरसोय झाली. वाहतूकीची कोंडी झाली. अशी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलली पाहिजेत", अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शीनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article