लोकमान्य सोसायटीच्या वतीने आज सांगेलीत नाट्यप्रयोग
04:15 PM Mar 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रसिद्ध गिरोबा उत्सवाचे औचित्य
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
सुमारे साडेतीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेला सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा प्रसिद्ध असा वैशिष्ट्यपूर्ण गिरोबा उत्सव उद्या बुधवार दिनांक १२ मार्च रोजी होत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमान्य मल्टिपर्पज को .ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा सावंतवाडीच्या वतीने आज रात्री ठीक ९ वाजता श्री बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळ नेरूर असरोंडी यांचा ''कर्कटा माया जाल हे अति चांगलं होतं'' हा नाट्यप्रयोग सांगेली सावंत टेंब येथे श्री रामू सावंत यांच्या निवासस्थानी होणार असून भाविकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे .
Advertisement
Advertisement