Maharashtra Weather Update | राज्यावर दुहेरी संकट: कुठे उष्णतेची लाट, तर कुठे वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'!
राज्यात उष्णतेची लाट ओसरताच वादळी पावसाचा यलो अलर्ट
पुणे -देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पसरलेली असतानाच राज्यातील बहुतांश भागात पुढील चार दिवस वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.दरम्यान, रविवारी वर्धा व अकोल्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.महाराष्ट्रात गेले दोन दिवस उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भात विशेषकरून उष्णतेची लाट आहे, तरदक्षिण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होत आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात अनेक भागात पाऊस नोंदविला, सोमवारपासून उष्णतेची लाट ओसरणार असून, कोकणपासून विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांतविजांचा कडकडाट व पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गुरुवारपर्यंत राज्यात हा इशारा दिला आहे. राज्यात रविवारी नोंदविलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे पुणे ४०., लोहगाव ४१.९, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३७.२, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४०.९, नाशिक ३९.४, सांगली ४०.६, सातारा ४०.९, सोलापूर ४२.९, मुंबई ३३.९, सांताक्रूझ ३४.८, रत्नागिरी ३२.८, पणजी ३४.२, डहाणू ३४.७, धाराशिव ४०, संभाजीनगर ४१.२, परभणी ४१.३, अमरावती ४४.२, बुलढाणा ४१.२, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४३.५, नागपूर ४४.४, वर्धा ४५, यवतमाळ ४३.२ सेल्सिअस.