For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News | एकापाठोपाठ सात जणांना घेतला चावा; कराडच्या हजारमाची परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

01:18 PM May 12, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   एकापाठोपाठ सात जणांना घेतला चावा  कराडच्या हजारमाची परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
Advertisement

                                हजारमाचीत कुत्र्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण;

Advertisement

कराड -हजारमाची (ता. कराड) येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत सहा बालके व एका महिलेला चावा घेऊन जखमी केले. सोमवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत घडलेल्या या घटनेने हजारमाची व ओगलेवाडी परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

हजारमाची ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण, राजारामनगर व आत्माराम शाळा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यात सुनील शहारूख शिंदे जखमी श्रीवंश कुकडे(वय ९), रुद्रांश सचिन सावंत (वय ७), महादेव विकास अडगळे (वय ५), शार्दुल महेश घाडगे (वय १०, सर्व रा. हजारमाची), श्रीवंश महेश कुकडे (वय साडेतीन वर्षे) व जहिरा मौला शेख (वय ५०, दोघे रा. राजाराम नगर) अशी जखमींची नावे आहेत.

Advertisement

कराड येथे उपचार करण्यात आले. जखमींवर सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्र व कॉटेज हॉस्पिटलया व्यतिरिक्त एका पारधी समाजाच्या लहान मुलालाही आत्माराम शाळेसमोर या कुत्र्याने चावा घेतला आहे. मात्र त्याने सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत उपचार घेतल्याची नोंद सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा कॉ टेज हॉस्पिटलमध्ये झालेली नव्हती. सोमवारी दुपारपासून एकापाठोपाठ एकाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्याने नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.युवकांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याचे काम केले, मात्र कुत्रे आढळले नाही.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
हजारमाची ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो परिसर, डिचोली रोड, ओगलेवाडी, एमएसईबी रोड आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांतून वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

Advertisement
Tags :

.