‘मॅथ्यू पेरी’च्या आयुष्यावरील माहितीपट येतोय
नेटफ्लिकसने दिवंगत ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीचे जीवन, त्याचा वारसा आणि त्याच्या संघर्षावर निर्मित तीन हिस्स्यांमधील डॉक्यूमेंट्री सीरिज ‘द वन अबाउट मॅथ्यू पेरी’चा ट्रेलर जारी केला आहे. मॅरी रॉबर्टसनच्या दिग्दर्शनात निर्मित या सीरिजमध्ये केवळ चँडलर बिंगच्या रुपात त्याची प्रसिद्धी नव्हे तर यात त्याचे अमली पदार्थांचे व्यसन, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आणि त्याला जवळून जाणाऱ्या लोकांविषयी दाखविण्यात आले आहे. डॉक्यूमेंट्रीत मॅथ्यूची बहिण मिया पेरी बोविक, त्याचे मित्र आणि सोबत काम करणारे लोक दिसतील. याचबरोबर पेरी परिवाराच्या खासगी कलेक्शनमधील छायाचित्रे आणि व्हिडिओही दाखविण्यात येतील. ही सीरिज 27 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध होण्याचे स्वप्न पाहण्याचा आणि नंतर टीव्हीवरील सर्वात मोठा कलाकार ठरणाऱ्या मॅथ्यूचा प्रवास यात दिसणार आहे. परंतु त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यावरही त्याच्या आयुष्यातील समस्या संपल्या नव्हत्या. मी खूप लोकप्रिय होऊ इच्छित होतो, याकरता मी देवाकडे प्रार्थन करायचो असे सांगत असतानाचा मॅथ्यूचा व्हिडिओ यात सामील आहे.
