For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सीएसके’- ‘आरसीबी’साठी आज ‘करो किंवा मरो’ची लढत

06:55 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सीएसके’  ‘आरसीबी’साठी आज ‘करो किंवा मरो’ची लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या पुनरगामनाची मोहीम आता मोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून आज शनिवारी पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि हवामान या दोघांशीही त्यांना लढावे लागणार आहे.s आयपीएलमधील प्ले-ऑफसाठीचा अंतिम संघ ठरविण्याच्या दृष्टीने जेव्हा दोन्ही बाजू भाडतील तेव्हा करो किंवा मरो अशी स्थिती असेल.

गुरुवारी हैदराबादमधील सामना पावसात वाहून गेला. याचा अर्थ असा आहे की, सनरायझर्स हैदराबाद हा प्लेऑफसाठी निश्चित संघ म्हणून कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सबरोबर सामील झाला आहे आणि शर्यत आता फक्त एका स्थानासाठी आहे. उत्तम धावसरासरी आणि अधिक गुण यांच्या जोरावर गतविजेते ‘सीएसके’ (13 गुण, 0.528 सरासरी) यांचे पारडे आज जड असेल. ते येथील आठ सामन्यांत फक्त एकदाच घरच्या संघाकडून हरले आहेत. आरसीबीचे 12 गुण आहेत आणि निव्वळ धावसरासरी 0.387 आहे.

Advertisement

मात्र, पावसाच्या अंदाजाने नाट्या आणखी वाढले आहे. सामना वाहून गेल्यास सीएसके प्लेऑफमध्ये जाईल, तर आरसीबीला किमान 18 धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा सुमारे 11 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठावे लागेल. आरसीबीने शानदार पुनरागमन केले असून सहा पराभवानंतर सलग पाच विजय मिळवले आहेत. ऑरेंज कॅपधारक कोहली गेल्या पाच डावांमध्ये तीन अर्धशतकांसह अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. तो आणखी एका शानदार प्रदर्शनास सज्ज झाला आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस पुन्हा फॉर्ममध्ये येईल अशी त्यांना आशा असेल.

मधल्या फळीत रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन या दोघांनी आकर्षक फॉर्म दाखवला आहे. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचा जास्तीत जास्त फायदा उठविण्याचा प्रयत्न करतील, जी सामान्यत: फलंदाजीस चांगली खेळपट्टी राहिलेली आहे. आरसीबीच्या गोलंदाजीत यश दयाल हा त्यांचा स्टार आहे. त्याने या हंगामात सर्वाधिक बळी घेतले आहेत. लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, ग्रीन आणि स्वप्नील सिंग यांच्यासमोर कठीण काम आहे. फलंदाजीत छाप पाडण्राया विल जॅक्सच्या रूपाने त्यांच्याकडे फिरकी गोलंदाजीचा आणखी एक पर्याय आहे. मात्र त्याचा या खेळपट्टीवर उपयोग होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाड या हंगामात संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला आहे आणि त्याच्याकडून चांगली सुऊवात होईल अशी अपेक्षा आहे. सहकारी सलामीवीर रचिन रवींद्रला देखील काही प्रमाणात सूर गवसला आहे आणि तो डॅरिल मिशेलसह वरच्या फळीला भक्कम आधार देईल अशी अपेक्षा असेल. शिवम दुबे पुन्हा आपल्या लयीत यावा अशी सीएसकेची तीव्र इच्छा असेल. गेल्या चार सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांनी मुस्तफिझूर रेहमान, मथीशा पाथिराना आणि दीपक चहर या प्रमुख त्रिकूटाच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. महेंद्रसिंह धोनीची प्रेरणादायी उपस्थिती हा एक महत्त्वपूर्ण घटक असला, तरी दुखापतीच्या चिंतेमुळे तो किती मोठी भूमिका बजावू शकतो हे पाहावे लागेल.

संघ : आरसीबी : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाशदेप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान.

सीएसके : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एम. एस. धोनी, महीश थीक्षाना, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, शेख रशिद, मोईन अली, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजित सिंग, आर. एस. हंगरगेकर आणि अरावेली अवनीश.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.