महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुनवळ्ळीत घडला धर्मांतराचा लांच्छनास्पद प्रकार

10:32 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागासवर्गीय महिलेला लव जिहादच्या ओढले जाळ्यात

Advertisement

बेळगाव : हुबळी येथील नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणातील आरोपीमुळे केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरात ठळक चर्चेत आलेल्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे आणखी एक धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागासवर्गीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने धर्मांतरासाठी छळ केल्याचे सामोरे आले आहे. 28 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुनवळ्ळी येथील रफिक लालसाब बेपारी, आदिल, सोहेल, मक्तुम, उमर, करेव्वा व कौसर या सात जणांविरुद्ध सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रफिक व त्याच्या पत्नीला अटक केली आहे. उर्वरित संशयितांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. हुबळी येथील विद्यार्थिनी नेहा हिरेमठचा मारेकरी फय्याज हा मूळचा मुनवळ्ळीचा. फय्याजला फाशी द्यावी, यासाठी मुनवळ्ळी येथे रोज आंदोलने सुरू असतानाच धर्मांतराचा हा प्रकार उघडकीस आला आहे.  महिलेने दिलेल्या फिर्यादीत अनेक धक्कादायक प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement

28 वर्षीय एक मागासवर्गीय महिला आपल्या पतीच्या दुकानात बसत होती. त्यावेळी रफिक खरेदीसाठी म्हणून त्या दुकानात यायचा. त्यावेळी दोघांचा परिचय झाला. रफिकने अन्य एका महिलेकडून दुकानदार महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. रफिकने तिचे लैंगिक शोषण केले. यासंबंधीची एकांतातील छायाचित्रे त्याने काढली होती.त्याद्वारे ‘पतीला घटस्फोट दे, नाहीतर तुझी अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करू’, अशी धमकी रफिकने दिली. रफिक व या महिलेतील संबंध कुटुंबीयांना कळाले. पती-पत्नीत भांडणही झाले. 2020 व 2021 मधील ही घटना आहे. जानेवारी 2021 मध्ये पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर आपल्या माहेरी जाण्यासाठी ही महिला बसस्थानकावर उभी होती. त्यावेळी रफिकने एका मुलाकरवी तिला निरोप दिला, ‘माहेरी जाऊ नकोस. आपणच तुझी व्यवस्था करू’, असे तिला सांगितले. थेट शाहूनगर-बेळगाव येथील एका स्वाधार केंद्रामध्ये तिची तात्पुरती व्यवस्था केली. येथे ती महिला चार महिने होती.

2023 मध्ये रफिकने बसव कॉलनी परिसरात एक घर भाड्याने घेतले. रफिक व त्याची पत्नी या घरात रहात होते. स्वाधार केंद्रातून पीडित महिलेलाही याच घरात बोलावण्यात आले. ती महिला घरात आल्यानंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव सुरू झाला. ‘कपाळावर कुंकू लावायचे नाही, रोज चारवेळा नमाज पढायला शिकून घे, बुरखा घाल’, असे सांगत तिला त्रास देऊ लागले. ही गोष्ट पीडित महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने बेळगावला येऊन बसव कॉलनी येथील रफिकच्या घरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला गाठले व तिला पुण्यात नेले. 3 एप्रिल 2024 नंतर धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव वाढला. त्यामुळेच पतीसोबत या महिलेने पुणे गाठले. तेथे घडला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघे 17 एप्रिल रोजी सौंदत्तीला आले. दुसऱ्या दिवशी रफिकसह सात जणांवर भादंवि 344, 365, 368, 376(1), 420, 506, सहकलम 149 व अॅट्रॉसिटी कलमांखाली फिर्याद दिली. लव जिहादचाच हा प्रकार असल्याचा आरोप केला जात असून पोलिसांनी रफिक व त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article