फेकून दिलेल्या शर्टला मिळतेय मोठी किंमत
1 लाखात खरेदी करत आहेत श्रीमंत
सद्यकाळात लक्झरी फॅशनच्या जगतात काहीही शक्य आहे. एकीकडे सर्वसामान्य व्यक्ती घरात इस्त्राr करताना शर्ट जळाल्यास तो फेकून देतात. तर श्रीमंतवर्ग या गोष्टींना ‘आर्ट’ किंवा ‘स्टेटमेंट पीस’ मानून लाखो रुपये देण्यास तयार आहेत. याचेच नवे उदाहरण स्वीस-फ्रेंच लक्झरी ब्रँड वेटेमेंट्सची नवे उत्पादन व्हाइट आयर्निंग बर्न ग्राफिक शर्ट आहे. या पांढऱ्या ओव्हरसाइज्ड शर्टवर खिशानजीक इस्त्राrने जाळल्याच्या खुणांसारखे ग्राफिक प्रिंट आहे. ही काही चूक नव्हे तर जाणूनबुजून केलेले डिझाइन आहे. याची किंमत कळल्यावर तुम्ही चकित व्हाल.
श्रीमतांची नवी फॅशन स्टेटमेंट
या शर्ट किंमत 1 लाख ते 1.03 लाख रुपयांपर्यंत आहे. सोशल मीडियावर हा शर्ट व्हायरल झाला आहे. वेटेमेंट्स ब्रँड पूर्वीपासूनच अशा अनोख्या आणि प्रोवोकेटिव्ह डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहे. हा ब्रँड ‘आयर्निक लक्झरी’ किंवा व्यंगात्मक लक्झरीचा मास्टर आहे. यापूर्वी या ब्रँडने टॅश बॅगला हँडबॅगचे स्वरुप देत लाखोंमध्ये विकले होते. तसेच फाटलेल्या जीन्सला हायफॅशनमध्ये सादर केले होते. अशाचप्रकारे आयर्न बर्न डिझाइनही ‘डिस्ट्रेड’ किंवा जुना/खराब दिसणाऱ्या लुकचा हिस्सा आहे. फॅशन इंडस्ट्रीत हा ट्रेंड दशकांपासून सुरू आहे, जेथे परफेक्शनऐवजी इम्परफेक्शनला सेलिब्रेट केले जाते.
श्रीमंत शौकिनांची पसंत
श्रीमंत लोक अशी उत्पादने खरेदी करतात, कारण हे त्यांच्या स्टेट्सचे सिंबल ठरले आहे. हे शर्ट कॉटनने तयार करण्यात आले असून पॉइंटेड कॉलर, ओव्हरसाइज्ड फिटयुक्त आणि समोर बटन क्लोजर आहे. परंतु याचे खरे वैशिष्ट्या प्रिंटेड बर्न मार्क असून तो इतका खरा वाटतो, की पहिल्या नजरेत शर्ट खरोखरच जळाल्याचे वाटू लागते. ब्रँड याला ‘ग्राफिक प्रिंट’ ठरवितो, जे फॅशनच्या भाषेत एक स्टेटमेंट ठरते.