बाजार भोगावात साकारतंय हक्काचं रग्बी खेळाचं मैदान
कोल्हापूर / संग्राम काटकर :
कोल्हापूरात रग्बी खेळाची बीजे पेरण्यापासून ते खेळाडू घडवण्यापर्यतची खटपट घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन व आनंद शैक्षणिक सामाजिक सेभाभावी संस्थेने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. रग्बी खेळाच्या सरावासाठी हक्काचे मैदान बनवणे असे हे महत्वाकांक्षी पाऊल आहे. पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव या गावातच मैदान साकारण्याचे ठरले. मैदानासाठी स्वत: आनंद शैक्षणिक सामाजिक सेभाभावी संस्थेकडून 1 एकर आणि शेतकरी रंजन आनंदा पाटील यांच्याकडून 4 एकर अशी 5 एकर जागा भाडेतत्वावर घेतली. टेकडीवर असलेली ही 5 एकराची जागा उकऊन तिचे सपाटीकरण केले आहे. आता पावसाळा संपल्यानंतर मैदान बनवून हिरवळ फुलवली जाणार आहे.
क्रीडानगरी कोल्हापूरात कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, नेमबाजी, जलतरण, बुद्धिबळ, कराटे, ज्युदो यासह विविध खेळाचे शेकडो खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या यादीत 2008 पासून रग्बी खेळाडूंची भर पडू लागली. ]िशरोली दुमाला, कोपार्डे, पाडळी आणि सडोली या गावातील तऊण रग्बी खेळाचा सराव करत होते. रग्बी खेळाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी कोल्हापुरातील रग्बीचे जाणकार व ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रा. अमर सासने, सडोली येथील आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू नरेंद्र खाडे, पाडळी खुर्द येथील अजित पाटील व दीपक पाटील यांनी कोल्हापुरातील शिवाजी पेठेत 2014-15 ला रग्बी कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनची स्थापना सुऊ केली. ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रा. अमर सासने यांच्याकडे असोसिएशनचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखील गेल्या 11 वर्षात असोसिएशनने कोल्हापूर जिह्यात सातशेहून अधिक महिला व पुऊष रग्बी खेळाडू तयार केला. यापैकी 250 हून अधिकहून अधिक राष्ट्रीय खेळाडू व 12 आंतराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावाऊपाला आले आहेत. आंतराष्ट्रीय खेळाडू नेपाळ, फ्रान्स, चीन, जपान, उझबेकिस्तान, हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले आहे. इतकेत नव्हेतर आंतरराष्ट्रीय महिला रग्बीपटू वैष्णवी पाटील, कल्याणी पाटील, श्रीधर निगडे व पृथ्वीराज पाटील यांना तर महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. या सर्व खेळाडूंना घडवण्यात प्रा. अमर सासने, दीपक पाटील, राहूल लहाने, अरविंद सोलापूरे, उमेश पाटील व (कै.) नरेंद्र खाडे या प्रशिक्षकांचा मोटा वाटा राहिला आहे.
- रग्बी मैदान बनवण्यासाठी उचललं महत्वाकांक्षी पाऊल...
सात वर्षांपुर्वी रग्बीच्या सरावासाठी हक्काचं मैदान असावं हा विचार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवला. मैदानासाठी लागणारे पैसे लोकसहभागातून उभा करण्यास सुऊवात केली. जमत राहणाऱ्या पैशातून पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव या गावात मैदान साकारण्याचे ठरवले. आनंद शैक्षणिक सामाजिक सेभाभावी संस्थेकडून 1 एकर आणि संस्थेच्या संचालक मंडळातील शेतकरी रंजन आनंदा पाटील यांच्याकडून 4 एकर अशी 5 एकर जागा भाडेतत्वावर मिळवली. तसेच मैदान निर्मितीसाठी असोसिएशनने आनंद शैक्षणिक सामाजिक सेभाभावी संस्थेलाही आपल्या सोबत घेतले. टेकडीवर असलेली ही 5 एकरची जागा उकऊन घेऊन सपाटीकरण केले. त्यासाठी दोन जेसीबीचा वापर केला. सध्या जागेचे सपाटीकरण पूर्ण झालेले आहे. आता पावसाळा संपल्यानंतर याच सपाटीकरणावर वाळू, मातीचा स्वतंत्र थर तयार केला जाईल. या थरावर रग्बी खेळण्यायोग्य हिरवळ तयार केली जाईल. या हिरवळीवर आंतरराष्ट्रीय नियमानुसार 110 मीटर लांब व 80 मीटर ऊंदीचे मैदान बनवले जाईल.
मैदानाला आंतराष्ट्रीय दर्जाचा लुक आणण्यासाठी चेजिंग ऊम, जीम, स्वच्छतागृह, खेळाचे साहित्य, जेवण विभाग, वसतीगृह बनवले जाणार आहे. या सर्व सोयी-सुविधा तयार करण्यासाठी 3 संस्थांना विनंती केली आहे. तसेच संबंधीत संस्थांनी कोणती सुविधा मैदानात तयार कऊन द्यावी याबाबतचा प्रस्ताव असोसिएशनने संस्थांकडे दिलेला पाठवले आहे. सोयी-सुविधा कऊन देण्यासाठी संस्थांनी ही सहकार्याची भूमिका घेतील आहे. येत्या दीड वर्षात मैदान सर्व बाजूंनी सुसज्ज कऊन कऊन प्रत्यक्ष रग्बी खेळाच्या सरावाला सुऊवात करण्याचे असोसिएशने प्रयत्न सुऊ ठेवले आहे.

- मैदानासाठी तब्बल 70 ऊपये खर्च अपेक्षीत...
रग्बी खेळाचे संपूर्ण मैदान तयार करण्यासाठी 70 लाख ऊपये खर्च अपेक्षीत धरला आहे. आतापर्यंत 22 लाख खर्च कऊन मैदानासाठी लागणाऱ्या जागेचे सपाटीकरण केले आहे. लोकसहभागातून मिळत राहिलेल्या पैशामुळेच मैदान बनवण्याच्या कामाला ताकत मिळाली आहे. आता मैदानातील उर्वरीत कामे कऊन घेण्यासाठी लागणारे अधिक पैसेही लोकसहभागातूनच उभे केले जात आहे.
प्रकाश पाटील (उपाध्यक्ष : कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन)