For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठ्यात घसरण

06:32 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठ्यात घसरण
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

सलग सात आठवडे विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ झाल्यानंतर मागच्या आठवड्यात मात्र चलन साठ्यात घसरण झाल्याची नोंद झाली आहे. 12 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये भारतीय विदेशी चलन साठा 5.4 अब्ज डॉलरने घटून 643.16 अब्ज डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे.  या आधीच्या पाच एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 2.98 अब्ज डॉलरने वाढत 648.56 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. हा  सर्वकालीन उच्चांक मानला जात होता. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सुवर्णसाठ्यामध्ये सदरच्या आठवड्यामध्ये 1.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आता हा सुवर्णसाठा 55.7 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.