For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kalamba Lake | कपडे काठावर अन् मृतदेह पाण्यात! कळंबा तलावातील घटनेने खळबळ

01:54 PM Sep 01, 2026 IST | NEETA POTDAR
kalamba lake   कपडे काठावर अन् मृतदेह पाण्यात  कळंबा तलावातील घटनेने खळबळ
Advertisement

कळंबा -कळंबा तलाबाच्या सांडव्याजवळ पाण्यात बुडून कसबा बावडा येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. संजय विठ्ठल कांबळे (वय ४६, रा. भगतसिंग रोड, कसबा बावडा, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. तलावाच्या सांडव्याजवळ पाण्याबर मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.

Advertisement

करवीर पोलिसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास कळंबा तलावाच्या सांडव्याजवळपाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील ब करवीर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

तलावाच्या काठावर आढळलेल्या कपड्यांवरून मृत व्यक्ती संजय विठ्ठल कांबळे असल्याचे स्पष्ट झाले. कांबळे हे कळंबा तलाव परिसरात पोहण्यासाठी आले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ते नेमके कोणत्या परिस्थितीत पाण्यात उतरले आणि त्यांचा बुडून मृत्यू कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.