For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरधाव कँटरची दुभाजक ओलांडून आयशरला धडक

11:08 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भरधाव कँटरची दुभाजक ओलांडून आयशरला धडक
Advertisement

हलग्यानजीक महामार्गावर अपघात, चौघे जण जखमी

Advertisement

बेळगाव : भरधाव कँटर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर चढून विरूद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकला जाऊन आदळला. गुरुवारी सकाळी हलगाजवळ हा अपघात घडला. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बागेवाडीहून बेळगावकडे येणाऱ्या कँटरवरील चालकाचे नियंत्रण सुटून कँटर थेट दुभाजकावर चढला. काकतीहून हिरेबागेवाडीकडे जाणाऱ्या आयशर ट्रकला या कँटरची धडक बसली. गुरुवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास हलगाजवळ घडलेल्या या अपघातानंतर काहीकाळ महामार्गावरील वाहतुकीतही व्यत्यय निर्माण झाला होता.

अपघाताची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक टी. बी. निलगार, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही वाहनांतील जखमींना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. कँटरची धडक इतकी जबरदस्त होती की आयशरची केबिन पूर्णपणे चेपली होती. कुंदन (वय 16), जितेंद्र कुमार (वय 30) दोघेही राहणार उत्तरप्रदेश अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या अपघातातील आणखी दोघा जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. यासंबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.