महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ओटवणेत भरवस्तीत धाडसी चोरी

01:31 PM Dec 20, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पत्र्याच्या ट्रंकमधील ६० हजार रुपये चोराने लांबवले

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
घरा जवळच्या ऑर्केस्ट्रासाठी रात्री घरातील सर्वजण गेल्याची संधी साधत घर फोडून एका घरातील पत्र्याच्या ट्रंकमधील सुमारे ६० हजार रुपयाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ओटवणे गावठणवाडी येथे घडली. दरम्यान भरवस्तीत आणि सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रापासुन अवघ्या १०० मीटरवर हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्यामुळे ओटवणे परीसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

ओटवणे गावठणवाडीत चव्हाटा नजिक प्रकाश शांताराम गावकर यांचे घर आहे. मंगळवारी रात्री चव्हाटा महोत्सवात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. घराजवळच्या या कार्यक्रमासाठी प्रकाश गावकर पत्नी व आईसह गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने रात्री १२ च्या दरम्यान घराच्या दरवाजाचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर या दरवाजाला आतून कडी लावुन घराच्या पाठीमागे असलेला कोयता घेऊन खोलीतील पत्र्याच्या ट्रंकचे कुलुप फोडले. त्यानंतर चोरटा या ट्रंकमधील प्लॅस्टिकच्या पिशवीतील रक्कम घेऊन घराच्या मागच्या दरवाजाने पसार झाला.याच ट्रंक मध्ये एका बाजूला डबीत सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. मात्र ही डबी चोरट्यांच्या नजरेपासून चुकली.प्रकाश गावकर गावात मोलमजुरी करतात. त्यांची पोटापुरती शेती बागायती असुन पोटाला चिमटा काढत यातुन मिळालेली कमाई त्यांनी बँकेत न ठेवता घरातच ठेवली होती. त्यांच्या या पुंजीवरच चोरट्याने डल्ला मारल्याने गावकर कुटुंबीयांना धक्का बसला. या चोरीची माहिती पोलिस पाटील लक्ष्मण गावकर यांनी सावंतवाडी पोलीस स्थानकात देताच पोलीस पोलिस हवालदार श्री धुरी श्री केरकर आदी घटनास्थळी दाखल झाले. घरात कोणी नसल्याची संधी साधूनच चोरट्याने हा डाव साधला त्यामुळे चोरटे माहितगार असल्याचे या धाडसी चोरीतून स्पष्ट होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg
Next Article