महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कारनाम्यांचा कळस

06:30 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत यूपीएससीकडून दाखल झालेली एफआयआर म्हणजे कारवाईचे पुढचे पाऊलच म्हटले पाहिजे. पूजा खेडकर यांनी आपल्या आईवडीलांचे नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी का रद्द करू नये, अशी नोटीसच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून धाडण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्याभोवतीचे संकटाचे ढग आता अधिकच गहिरे झालेले दिसतात. स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावणे, अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करणे व  सहकारी कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करणे, येथपासून सुरू झालेली पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. दररोज खेडकर कुटुंबीयांशी संबंधित नवनवीन खळबळजनक माहिती पुढे येत आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र, व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टिदोषाचे प्रमाणपत्र सादर करणे, यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही चालढकल करणे, कुठल्यातरी सेंटरमधून एमआरआय अहवाल मिळवणे, अशा असंख्य गोष्टींमधून त्यांचा येथपर्यंतचा प्रवासच संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. मुळात यूपीएससी आणि केंद्रीय नागरी सेवा न्यायप्राधिकरणाने (पॅट) विरोध केला असतानाही त्यांना आयएएस पद कसे देण्यात आले? त्यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने तर वजन वापरले नाही ना, असेही अनेक प्रश्न उपस्थित होतात. पूजा ही 2022 मध्ये यूपीएससी परीक्षेत 821 वी रँक मिळून उत्तीर्ण झाली. या रँकसह त्यांना आयएएस दर्जा मिळणे शक्मय नव्हते. कारण त्यावषी ओबीसी पॅटेगरीतून आयएएस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक 434 होती. म्हणजे या विद्यार्थ्यांपेक्षा पूजा खेडकर यांची रँक दुपटीने मागे असूनही त्या आयएएस झाल्या. कारण, मल्टिपल डिसॅबिलिटीज असल्याचा दावा तिने केला होता. मात्र, त्याआधी 2019 ला युपीएससीची परीक्षा देताना तिने असा कुठलाही दावा केला नव्हता. विशेष म्हणजे ‘पॅट’ने त्यांचा हा दावा फेटाळल्यावरही पूजा खेडकरची आयएएससाठी निवड झाली. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकरचे स्वत:चे उत्पन्न 42 लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे 40 कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या, हेही एक कोडे आहे. पूजा खेडकरने उत्पन्नाबाबत दिलेल्या माहितीत तिची पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी आणि अहमदनगर जिल्ह्यात तीन ठिकाणी जमीन असल्याचे म्हटले आहे. या मालमत्तांची एकूण किंमत एक कोटी 93 लाख ऊपये असून, त्यापासून तिला 42 लाख ऊपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे तिचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यांच्या मालमत्तांची एकूण रक्कम चाळीस कोटी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ओबीसी पॅटेगरीतून सवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेली आठ लाख ऊपये उत्पन्नाची मर्यादा असलेले सर्टिफिकेट त्यांना कसे मिळाले, याचे उत्तर मिळत नाही. दुसरीकडे पूजाच्या आईवडिलांशी संबंधित पुढे आलेल्या गोष्टीही अतिशय धक्कादायक म्हणता येतील. यातून शासकीय सेवेचा कसा आणि किती गैरवापर केला जाऊ शकतो, हेच अधोरेखित होते. पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्मयातील धडवली गावातील शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रसारित झालेला व्हिडिओ बरेच काही सांगून जातो. याप्रकरणी मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यासह एकूण सातजणांविऊद्ध पौड पोलिस ठाण्यात वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली असून, पोलीस दिलीप खेडकर यांच्याही मागावर आहेत. कधी शेतकऱ्यांना पिस्तूलाचा धाक दाखवायचे, कधी रस्त्यावर अतिक्रमण करायचे, तर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी धमकी द्यायची, हे म्हणजे उद्दामपणाचा कळसच म्हटला पाहिजे. पूजाचे वडील दिलीप खेडकर शासकीय सेवेत असताना त्यांनी कोट्यावधी ऊपयांची संपत्ती कमावल्याचे सांगितले जाते. त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली असून मुळशी तालुक्मयात 25 एकर जमीन त्यांच्या नावे आहे. जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरदेखील त्यांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या साऱ्या आरोपांची योग्य ती पडताळणी करून खेडकर कुटुंबीयांवरील गुन्हे निश्चित करणे आवश्यक आहे. शासकीय सेवेत जाण्यासाठी लाखो विद्यार्थी प्रचंड कष्ट उपसत असतात. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असतानाही केवळ अधिकारी बनण्याच्या स्वप्नापायी या विद्यार्थ्यांना कितीतरी वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यातही अनेक विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. अशी सर्व स्थिती असतानाही धनदांडग्यांची मुले सर्व नियमअटींचा भंग करून आयएएस होत असतील, तर त्याचा दोष आपल्या यंत्रणांनाही द्यावा लागेल. एखादा उमेदवार स्वत:च्या, आईवडिलांच्या नावासह फोटो, स्वाक्षऱ्या बदलतो, तरीही कुणाच्या काही नजरेत कसे येत नाही, हाच मुळात प्रश्न होय. आता पूजावर गुन्हा दाखल झाला आहे. तिची निवडही कदाचित रद्द होईल. पण, याच्या मूळाशी नेमके काय आहे, कोण आहे, याचा जोवर थांग लागत नाही, तोवर या प्रकरणाचे गूढ खऱ्या अर्थाने उकलणार नाही. मागच्या काही वर्षांतील परीक्षा घोटाळ्यांमुळे राज्यासह देशातील शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. अगदी परीक्षा रद्द करण्याचे प्रसंगही घडले आहेत. या साऱ्यात कुणाचे नुकसान होत असेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे. त्यामुळे आगामी काळात परीक्षा वा नियुक्तीपद्धत अधिकाधिक पारदर्शकपणे कशी पार पाडता येईल, यावर लक्ष ठेवणे, ही काळाची गरज असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article