For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : बागणी गावच्या हद्दीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी

05:04 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   बागणी गावच्या हद्दीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी
Advertisement

                        आष्टा परिसरातील रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी लक्ष देण्याची गरज

आष्टा
: शिगाव ते बागणी रोडवर बागणी गावच्या हद्दीत मातोश्री बारसमोर झालेल्या भीषण अपघातात चाकण (पुणे) येथील रहिवासी असलेले अभिजित रविंद्र यादव आणि त्यांची पत्नी वर्षा अभिजित यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. समोरून येणाऱ्या एका भरधाव हुंडाई आय-१० कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय रविंद्र यादव (वय २६, रा. चाकण, पुणे, मूळ रा. एनकुळ, ता. खटाव) यांचा भाऊ अभिजित आणि बहिनी वर्षा हे आपल्या मित्राची दुचाकी घेऊन जोतिबा (कोल्हापूर) येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परत येत असताना, बागणीकडून येणाऱ्या हुंडाईआय-१० कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात अभिजित यादव यांच्या दोन्ही पायांना आणि उजव्या हाताला फॅक्चर झाले आहे. तर वर्षा यादव यांच्या उजव्या पायाला फ्रैक्चर होऊन बरगडीला व हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. या धडकेत दोन्ही बाहनांचे मिळून सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.(रा. याप्रकरणी कार चालक धनंजय अरुणकुमार कुलकर्णी पलूस, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अक्षय यादव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.