For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुत्र्यांना खाणारा देश

06:06 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुत्र्यांना खाणारा देश
Advertisement

कुत्रा किंवा श्वान हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो, याची आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशा या चांगल्या मित्राचा आपल्या आहारात समावेश करावा अशी कल्पनाही बहुतेकांच्या डोक्यात येणार नाही. कुत्रा हा खाण्याचा पदार्थ असू शकतो हा विचारही कित्येकांना तिरस्करणीय वाटेल यात शंका नाही. तथापि काही देश असे आहेत, की जेथे प्रतिवर्षी हजारोंच्या संख्येने कुत्रे मारले जातात. त्यांचे मांस मिटक्या मारत खाल्ले जाते. कुत्र्याचे मांस विकणे हा या देशात एक लाभदायक व्यवसाय असून अनेकजण त्यात आहेत.

Advertisement

कुत्र्याच्या मांसाचा आहारात समावेश, ही अगदीच नवीन बाब आहे असेही नव्हे. कारण भारतातील काही आदीम जमातींमध्ये अशा आहाराची प्रथा आहे. चीनच्याही काही भागांमध्ये कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. पण सर्वाधिक प्रमाण दक्षिण कोरिया या देशात आहे. या देशात अनेक शतकांपासून श्वासमांसाचा आहारात समावेश करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या देशातील लोकांना त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही. या मांसाचा उपयोग करुन तयार केलेल्या अनेक ‘डिशेस’ या देशात लोकप्रिय आहेत. थोरांपासून सानांपर्यंत सर्वांना या आहाराची सवय आहे. पण आता येथील परिस्थितीही पालटणार आहे, असे दिसते.

कारण, कुत्र्याच्या मांसावर या देशात बंदी घातली गेली आहे. 7 ऑगस्टपासून ही बंदी क्रियान्वित करण्यात आली आहे. या देशात हे मांस विकणारी 5 हजार 600 दुकाने आहेत. ती आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, या दुकानदारांना होणाऱ्या व्यावसायीक हानीची भरपाई देण्यात येईल, अशीही घोषणा दक्षिण कोरियाच्या सरकारने केली आहे. तसेच कुत्र्याच्या मांसाचे पदार्थ विकणाऱ्या रेस्टॉरेंटस्नाही हानीची भरपाई काही काळापर्यंत दिली जाणार आहे. या बंदीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आता ही परंपरा मोडली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.