गायींवर जीव लावणारा समुदाय
गोमुत्राने स्वच्छ करतात शरीर
जगात अनेक प्रकारचे लोक राहतात. जगात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. जगातील एका ठिकाणची संस्कृती ही भारतीय संस्कृतीशी बऱ्याचअंशी मिळतीजुळती आहे. येथील आदिवासी समुदाय स्वत:च्या गुरांनाच सर्वस्व मानतो. या समुदायाच्या लोकांचे पूर्ण जीवनच गुरांभोवती फिरत असते. या लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हाच असल्याने हे लोक गायींना शक्य तितक्या सुविधा देतात. हे लोक मशीनगन हातात घेत गाय-बैलांची सुरक्षा करतात.
आफ्रिकेच्या दक्षिण सूदानमध्ये राहणारा एक आदिवासी समुदाय मुंडारीसाठी गाय केवळ पशू नव्हे तर त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. गायी जेव्हा या समुदायाचे लोक मशीनगन घेऊन पहारा देतात. तसेच हे लोक गोमुत्राद्वारे स्वत:चे डोक धुत असतात आणि यात असलेल्या यूरिक अॅसिडद्वारे त्यांचे केस रंगून जातात. गायीच्या शेणाद्वारे ते दात साफ करतात आणि त्याचा पावडर म्हणूनही वापर करतात. मुंडारी समुदायाच्या या लोकांसाठी गाय त्यांच्या कुटुंबाप्रमाणे आहे आणि त्यांच्यापासून किंचित दूर राहू इच्छित नाहीत. गायींची मोठी सेवा केली जात असल्याने त्यांची उंची 8 फूटांपर्यंत असते.
या समुदायाने पाळलेल्या गाय-बैलांची किंमत सुमारे 42 हजार रुपये असते. याचमुळे त्यांना तेथे हुंड्यादाखल किंवा भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात येते. मुंडारी लोक स्वत:च्या गुरांची दिवसातून दोनवेळा मालिश करतात आणि स्वत:च्या पसंतीच्या पशूनजीक झोपतात. हे पशू त्यांच्यासाठी स्टेटस सिंबल असतात. विवाहात ब्राइड प्राइस म्हणून याच पशूंना देण्यात येते. याचे शेण आणि गोमुत्राला अँटीबायोटिकपासून डासांपासून सुरक्षेसाठी वापरण्यात येते.