For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवता म्हणून पूजलेला गोळा

06:38 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
देवता म्हणून पूजलेला गोळा
Advertisement

मध्यप्रदेशच्या एका गातील रहिवासी वर्षभरापासून दगडी गोळ्याच्या स्वरुपातील वस्तूला ‘कुलदेवता’ म्हणून पुजत होत. मात्र यासंबंधी आता एक थक्क करणारा खुलासा झाला आहे. ग्रामस्थ ज्या दगडी गोळ्यांची पूजा करत होते, ते दैवी नसून चक्क एका डायनासॉरचे जीवाश्म अंडं असल्याचे समोर आले आहे. कुलदेवता स्वत:च्या शेतजमिनीचे आणि पशूधनाचे संकटापासून रक्षण करतील या समजुतीनुसार धारच्या पाडळ्यातील ग्रामस्थ या गोळ्यांची पूजा करत होते.

Advertisement

या गोळ्यांना ते नारळ अर्पण करायचे आणि पूजाही करायचे. तर पावसाळ्यात बकऱ्याही अर्पण करत होते. मात्र तज्ञांच्या पथकाने गावाला भेट दिल्यावर हे दगड लाखो वर्षे जुनी डायनासोरची अंडी असल्याचे उघड झाले.

अनेक ठिकाणी खोदकाम करताना अशाप्रकारचे गोळे सापडले होते. सर्वत्र या गोळ्यांची पूजा केली जात होती. लखनौच्या बिरबल साहनी इन्स्टीट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेसच्या तज्ञांनी नुकतीच या क्षेत्राला भेट दिली होती. या तज्ञांच्या मार्फत या ग्रामस्थांना ज्या दगडी गोळ्याची आपण पूजा करत आहोत ते प्रत्यक्षात डायनासोरच्या टायटॅनोसॉरस प्रजातीची अंडी असल्याचे कळले.

Advertisement

आमच्याकडे एक डायनासोर पार्क असून ते 2011 मध्ये निर्माण करण्यात आले होते. परिसरात अनेकदा अशाप्रकारचे जीवाश्म आढळत असतात आणि लोक त्यांची पूजा करत असतात अशी माहिती विभागीय वन अधिकाऱ्याने दिली आहे. धार जिल्ह्यातील  बाग परिसरात जीवाश्म संकलन आणि संवर्धन केंद्र आहे.

डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यानात विविध जुन्या काळातील जीवाश्म ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 250 हून अधिक डायनासोरची अंडी सापडली आहेत. मध्यप्रदेशातील नर्मदा खोऱ्यात डायनासोरची मोठी संख्या होती असे मानले जाते. डायनसोर सुमारे 175 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते, यापैकी हजारो प्रजाती पुढील काळात नामशे झाल्याचे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.