राज्यात काही तासातच लागणार आचारसंहिता ; विधानसभेचे बिगुल वाजणार
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह, झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर कऱण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे . गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. अशातच मोठी बातमी समोर आली असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी आहे. बऱ्याचदा सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नसल्याने दिवाळीच्या आधीच किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका पार पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.