Satara : उंब्रजमध्ये मद्यधुंद परप्रांतीयाच्या दुचाकीने दहावीचा विद्यार्थी गंभीर जखमी
मद्यधुंद परप्रांतीय दुचाकीस्वाराकडून धडक ; दहावीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी
उंब्रज : उंब्रज ता.कराड येथील कॉलेज रोडवर दहावीच्या विद्यार्थ्यांला मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या परप्रांतीय दुचाकी स्वाराने जोराची धडक दिली. या अपघात इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर उंब्रज येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवार दि.१४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या ही घडली आहे. जखमी विद्यार्थ्यांस गंभीर तातडीने कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेदांत निकम राहणार साबळवाडी ता.कराड असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि.१४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक परप्रांतीय कामगार मद्यधुंद अवस्थेत त्याच्या ताब्यातील दुचाकी सुसाट वेगाने कॉलेज रोडवरून चालवत होता. या दुचाकीची विद्यार्थ्यांस जोराची धडक बसली. सदरचा विद्यार्थी हा महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. उपस्थित नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांला उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल नेले मात्र त्यास गंभीर मार लागला असल्याने कराड येथे घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्याने जखमी विद्यार्थ्यास तातडीने कराडच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली त्यातील काही युवकांनी वेदांत यास उपचारासाठी उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले वेदांत याच्या डोक्याला मार लागल्याने त्यास कराडला हलवण्याच्या सूचना तेथील वैद्यकीय विभागाने दिल्याने त्यास उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले. दरम्यान अपघातानंतर उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणावर युवकांनी गर्दी केली होती. तसेच घटनास्थळी नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या परप्रांतीय दुचाकीस्वारास चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. उंब्रज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.