For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोपटांशी लढतेय शहर

06:31 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोपटांशी लढतेय शहर
Advertisement

नजीकच्या पर्वतावरून आले हजारो पक्षी

Advertisement

अर्जेंटीनाच्या  पूर्व अटलांटिक किनाऱ्यानजीक हिलारियो एस्कासुबी शहर मागील काही काळापासून वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे. हे शहर मोठ्या संख्येत पोपट आल्याने समस्येत सापडले आहे. हजारोंच्या संख्येत पोपट जंगलातून शहरात दाखल झाले आहेत. या पोपटांमुळ शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे, तसेच त्यांच्या आवाजामुळे तसेच त्यांच्याकडून वायरी तोडण्यात येत असल्याने लोकांचे जीवन अवघड ठरत आहे. शहरानजीकच्या वनांची बेछूट तोड होत असल्याने हे पक्षी शहरात पोहोचले आहेत.

पोपटांचा थवा विजेंच्या तारांना तोडत असल्याने वीजसेवा ठप्प होत आहे. तर कधी फोन आणि इंटरनेटची वायर पक्षी तोडून टाकत आहेत. पोपट कुठल्या न कुठल्या प्रकारे दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करत असल्याचे स्थानिकांचे सांगणे आहे.

Advertisement

पोपटांना घाबरविण्यासाठी आणि पळवून लावण्यासाठी स्थानिक लोक अनेक प्रकारचे मार्ग अवलंबित आहेत. पोपटांना घाबरविणारा आवाज आणि लेझर लाइटचा वापर करत त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. लोकांच्या दैनंदिन जीवनात पोपट अडचणी निर्माण करत आहेत.

आसपासच्या पर्वतांमध्ये पूर्वी घनदाट जंगल फैलावले होते. या वनांमध्ये हे पक्षी मोठ्या संख्येत रहायचे. परंतु अलिकडच्या वर्षांमध्ये वनतोड होत असल्याने हे रंगबिरंगी पक्षी बेघर झाले आहेत. अर्जेंटीनामध्ये वन गायब होत असल्याने हे पक्षी अन्न आणि आश्रयाच्या शोधात नजीकच्या शहरात पोहोचत आहेत.

मागील काही वर्षांमध्ये पोपटा शहरांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून हिवाळ्यात हे पक्षी शहरात आश्रयाकरता येतात. स्थानिक लोकांसाठी पोपटांचा हा थवा समस्येचे कारण ठरतो. परंतु त्यांचा अधिवासच नष्ट करण्यात आल्याने हे पक्षी शहरात पोहोचत असल्याचे समजून घ्यावे लागेल असे जीवशास्त्रज्ञ डायना लेरा यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.