For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रक-गुड्स वाहनाच्या धडकेत बेन्नाळीनजीक बालकाचा मृत्यू

01:29 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रक गुड्स वाहनाच्या धडकेत बेन्नाळीनजीक बालकाचा मृत्यू
Advertisement

बेळगाव : ट्रकचालकाने कसलाही सिग्नल न देता आपली ट्रक थांबविल्याने पाठीमागून येणाऱ्या गुड्स वाहनाची ट्रकला धडक बसून एका बालकाचा मृत्यू झाला. तर गुड्स वाहनाचा चालक जखमी झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळीजवळ बुधवारी दुपारी हा अपघात घडला आहे. अनिकेत लखन किळीकेतर (वय 9) रा. हत्तरगी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. टाटा गुड्स वाहनाचा चालक शानूर किळीकेतर (वय 30) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. काकती पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेश्वरहून बेळगावकडे येणाऱ्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकच्या पाठीमागे असलेल्या गुड्स वाहनाची धडक बसली. ट्रकचालक संतोष केळगेरी, रा. कल्लोळ, ता. चिकोडी याच्यासह गुड्स वाहनाच्या चालकावरही एफआयआर दाखल करण्यात आला असून काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.