Satara News : चार्जिंग की पार्किंग पॉईंट, कधी कधी आंदोलनकर्त्यांचा पॉईंट
सातारा नगरपालिकेचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वयनात अपयशी
सातारा : सौर उर्जा बळकटीकरणासाठी शासनाच्या अनुदानातून सातारा नगरपालिकेने दोन ठिकाणी चार्जिंग पॉईंट उभे केले होते. मात्र हे चार्जिंग पॉईंट नुसते नावाला असून त्या ठिकाणी पेट्रोलची दुचाकी बाहने उभी केली जात असल्याने तो पार्किंग पॉईंट बनला आहे. कधी कधी आंदोलनकर्त्याचा पॉईंट बनतो आहे. त्यामुळे नेमके कशासाठी केले आणि कशासाठी वापरले जाते, अशीही सामाजिक कार्यकर्ते विचारु लागले आहेत.
सातारा नगरपालिकेच्यावतीने वेगवेगळ्या शासनाच्या योजना राबवण्यात येतात. शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या स्पर्धेतही सहभाग घेतला जातो. अक्षय उर्जा तथा सौर उर्जाचा वापर वाढावा याकरता केंद्र व राज्य शासनाच्यावतीने नगरपालिकांना चार्जिंग पाँईटदिले होते. त्याची उभारणीही सातारा पालिकेने केली होती. मात्र, हे सुरु केलेले चार्जिग पाईंट नुसते शो पिस बनले आहेत.
याच चार्जिंग पॉईंटचा वापर दुचाकी वाहनांकरता केला जात असून तेथे काही आंदोलनकर्ते हे आंदोलन करण्याचे ठिकाण म्हणूनही वापरतात. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते अॅड. वैभव मोरे यांनी खेद व्यक्त करत म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचा पैसा कसा बाया घालवायचा हेच या माध्यमातून पहायला मिळत आहे. जनतेच्या पैशातून सुरु केलेले हे चार्जिंग स्टेशन असून त्यावर आजपर्यंत किती गाड्या चार्जिंग केल्या आहेत हा संशोधनाचा मुद्दा आहे.
पालिकेच्या इमारतीच्या आवारात पार्किंगचा प्रश्न आहे म्हणून येथे पार्किंग पॉईंट सुरु केल्याचे दिसत आहे. असा सामान्यांचा पैसा बाया घालवू नये, अशी विनंती शासनाला करतो, असे त्यांनी सांगितले.