For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी शाळांना दीड कोटीची बक्षिसे जिंकण्याची संधी; माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती

06:05 PM Dec 23, 2023 IST | Kalyani Amanagi
खासगी शाळांना दीड कोटीची बक्षिसे जिंकण्याची संधी  माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती
Advertisement

माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचा यामध्ये सहभाग होणार आहे. केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा एकूण पाच स्तरावरून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक स्तरावर शंभर गुणांचे गुणांकन करून शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून शाळांना 1 कोटी 47 लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्व शाळांनी आपल्या स्तरावरून स्वमूल्यमापन करून केंद्र स्तरावरील स्पर्धेसाठी तयारी करावी असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

Advertisement

सदरचे मूल्यांकन दोन विभागात विभागलेले आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण, शाळा व परिसराचे सौंदर्यकरण दहा गुण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णयातील सहभाग 15 गुण, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम 10 गुण, शाळेची इमारत व परिसर स्वच्छता 10 गुण, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रोत्साहन देण्याबाबत उपक्रम 05 गुण, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन देशी खेळांना प्राधान्य 10 गुण, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित विविध उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग 40 गुण, आरोग्य 15 गुण, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास 10 गुण, भौतिक सुविधा व अध्ययन अध्यापनात सुलभता आणण्यासाठी कार्पोरेट संस्थाकडून लोक सहभाग- 03 गुण, तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा व पोषणशक्ती अभियान उपक्रम 05 गुण, विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थी पालक यांचा सहभाग 05 गुण दिले जाणार आहेत. तालुकास्तर ते राज्यस्तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तालुकास्तरावर 3 लाख, 2 लाख व 1 लाख, जिल्हास्तरावर 11 लाख ,5 लाख व 3 लाख, विभाग स्तरावर 21 लाख, 11 लाख व 7 लाख तर राज्यस्तरावर 51 लाख 21 लाख व 11 लाख अशा भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

विभागनिहाय गठीत केली जाणार समिती

शासनामार्फत केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी ,जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालक व राज्यस्तरावर शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून प्रत्येक स्तरावर मूल्यमापन करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.