खास मच्छरांमुळे चमकणारी गुहा
भिंतींना स्पर्श करण्यास मनाई, कोट्यावधी वर्षे जुन्या जीवांचे अस्तित्व
वेटोमो गुहा स्वत:च्या अदभूत खडक आणि चमकणाऱ्या खिडांच्या गुहांसोबत प्रभावशाली दिसते. न्यूझीलंडचे अत्यंत लोकप्रिय आकर्षण जाणण्याजोगे आहे. याचा इतिहास आणि येथे आढळणाऱ्या जीवांमुळे या गुहा अत्यंत वेगळी कहाणी ठरतात.
येथील किड्यांना ग्लोवॉर्म म्हटले जाते, परंतु हे कीडे नाहीत, पण ते चमकतात. न्यूझीलंडच्या वेटोमो गुहांमध्ये राहणारे ग्लोवॉर्म प्रत्यक्षात एकप्रकारचे मच्छर आहेत, ज्यांना एराचनोकॅम्पा ल्युमिनोसा म्हटले जाते. येथे मुंग्या आणि विशाल झींगुर देखील आढळते. गोड्या पाण्याची नदी किंवा नाल्यांद्वारे येथे अनेक छोटी भूमिगत सरोवरं निर्माण झाली होती, जी न्यूझीलंडच्या लाँगफिन ईलचा अधिवास आहेत.
या गुहांच्या निर्मितीची कहाणी देखील अनोखी आहे. स्टॅलेक्टाइट आणि स्टॅलेग्माइट सरंचनांना निर्माण करणारे चुनादगडाचे खडक सागरी जीवांचे अवशेष आणि आच्छादनांमुळे निर्माण झाले होते. टेक्टोनिक हालचालींमुळे न्यूझीलंडचा भूभाग समुद्राच्या वर उचलला गेल्यावर येथील तळ पर्वताला स्वत:सोबत वर घेऊन आला. मग सुमारे 10 लाख वर्षांपूर्वी पर्वत पावसाच्या संपर्कात आला, ज्यात कालौघात अनेक भेगा निर्माण झाल्या, ज्यात अखेरीस गुहा अस्तित्वात आल्या.
वेटोमा गुहा प्रत्यक्षात गुहांचे एक जाळे आहे, येथे शेकडो गुहा आहेत. 1800 च्या दशकात वेटोमा गुहांचा शोध लावणारे पहिले व्यक्ती माओरी प्रमुख ताने टिनोरौ होते. स्थानिक सर्वेक्षकासोबत गुहांचा शोध लावल्यावर सथानिक माओरी गाइड 1904 मध्ये पर्यटकांना गुहेपर्यंत घेऊन जाऊ लागले.
वेटोमो गुहांमध्ये फिरताना चुनादगडला स्पर्श केल्याने तो हिस्सा नष्ट होऊ शकतो याची खबरदारी बाळगावी लागते. वेटोमो गुहांमध्ये स्टॅलेक्टाइट्स, स्टॅलेग्माइट्स, पिलर आणि हेलिक्टाइट्स दिसून येतात, त्यांच्या निर्मितीकरता हजारो वर्षे लागली आहेत. या सरंचना नाजूक असण्यासोबत मानवी त्वचेवर असणारे रसायन देखील चुनादगडासोबत प्रतिकूल रिअॅक्शन घडवू शकते.
वेटोमो गुहा ग्लोवमर्सचा अधिवासा असून यात आणखी एक अदभूत किटक दिसून येतो, ज्याला केव वेटा म्हटले जाते. याला केव क्रिकेट या नावाने देखील ओळखले जाते. वेटा न्यूझीलंडमध्ये आढळून येते, याच्या 70 वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ज्यातील एक प्रजात विशाल वेटा जगातील सर्वात मोठा किडा आहे. न्यूझीलंडमध्ये 300 हून अधिक गुहा आहेत, यातही ग्लोवॉर्म वेटोमो गुहांमध्ये सर्वात प्रसिद्ध असून त्या 130 हून अधिक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करत आहेत.