महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी महाराज मूर्ती अवमान प्रकरणातील एक गुन्हा रद्द

11:34 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उच्च न्यायालयाकडून कार्यकर्त्यांना दिलासा

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात उमटले होते. ध. संभाजी चौक येथे म. ए. समिती आणि हिंदु कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी कार्यकर्त्यांवर सात वेगवेगळे गुन्हे दाखल केले. त्यामधील एक गुन्हा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला असून म. ए. समिती आणि हिंदु कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान झाला. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. 18 डिसेंबर 2021 रोजी 35 कार्यकर्त्यांवर खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात अॅड. राम घोरपडे यांनी धारवाड उच्च न्यायालयामध्ये खटला रद्द करण्यासाठी दावा दाखल केला. या ठिकाणी वकिलांनी कार्यकर्त्यांची बाजू मांडली. न्यायालयाने ती बाजू ग्राह्या धरत एक गुन्हा रद्द ठरविला आहे. भरत मेणसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक लक्ष्मण सुतार, सुनील लोहार, मंगेश माळवी, विनायक संजय सुतार, गजानन जाधव, विनायक कोकितकर, दयानंद बडसकर, सूरज गायकवाड, राहुल भराले, गौरांग गेंजी, सरिता पाटील, लोकनाथ रजपूत, महेश मुतगेकर, नागेश कासिलकर, राहुल सामंत, सिद्धू गेंजी, गणेश येळ्ळूरकर, सूरज शिंदोळकर, विकी मंडोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, हरिष मुतगेकर, भागेश नंद्याळकर, रितीक पाटील, राजेंद्र बैलूर, श्रेयश खटावकर, शशिकांत अरकेरी, शुभम ठाकुर, प्रशांत चव्हाण, प्रज्वल किटवाडकर, विश्वनाथ गडकरी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article