ग्रामपंचायत सदस्य मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
कणेरी तालुका करवीर येथील लोकनियुक्त सरपंच निशांत पाटील यांच्या घराच्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मोजणीच्या संदर्भात ग्रामपंचायतचे सदस्य उदय चोरडे यांनी अर्ज दाखल केला होता .त्या नुसार आज मोजणी आली असता यामध्ये शाब्दिक वाद होऊन मारामारी झाली.यामध्ये कणेरी सरपंच यांच्यासह पाच जणांवर सदस्य उदय चोरडे यांनी गोकुळ शिरगाव पोलिस गुन्हा दाखल केलाआहे.
याबाबत पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. 16 रोजी दुपारी सरपंच यांच्या घराची मोजणी आली असता ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये लोकनियुक्त सरपंच निशांत गिरीधर पाटील, प्रशांत प्रकाश पाटील, मिथुन मदन पाटील, निखिल बाबुराव माळी ,मारुती शामराव गणेशाचार्य ( सर्व रा. कणेरी ) यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याबद्दल कणेरीचे ग्रामपंचायत सदस्य उदय चोरडे यांनी पाच जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे स.पो..नि . दिगंबर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पी.वाय. पाटील अधिक तपास करीत आहेत.