For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Student Drawn in Tank पोहायला येत नसतानाही त्याला टँकमध्ये उतरवलं, विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तिघांवर गुन्हा दाखल

04:54 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
student drawn in tank पोहायला येत नसतानाही त्याला टँकमध्ये उतरवलं  विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तिघांवर गुन्हा दाखल
Advertisement

सांगली : शाळा प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिंदे मळा परिसरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षीय आदित्य विकास ओलेकर याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी शाळेसह जलतरण तलावाची जबाबदारी असलेल्या दीपक सदलगे आणि विजय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नुकताच सहावीत प्रवेश

 कोकळे येथील आदित्यला यंदाच सहावीत प्रवेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे, आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती त्याच्या पालकांनी शाळेला आधीच दिली होती. असे असतानाही शनिवारी सायंकाळी त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत जलतरण तलावात उतरविण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. तलावात उतरवल्यानंतर आदित्यचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी...

Advertisement

शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आदित्यचा जीव गेल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत संजयनगर पोलिसांनी मृत विद्यार्थ्याचे वडील विकास ओलेकर यांच्या फिर्यादीवरून शाळा प्रशासन, दीपक सदलगे आणि विजय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निष्पाप जीव गेल्यानंतर यंत्रणा जागी

एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच जबाबदार यंत्रणा जागी झाल्याची भावना व्यक्त होत असून, पोहता येत नाही हे माहीत असताना मुलाला तलावात का उतरवले?, सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? आणि जलतरण प्रशिक्षणादरम्यान आवश्यक देखरेख होती का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश कदम करत असून त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आदित्यच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Advertisement
Tags :

.