जेवण न दिल्याच्या रागातून कुंभारमाठ येथे हॉटेल कामगारांना मारहाण
12:25 PM Feb 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
७ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही म्हणून हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण करून दुखापत करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी वैभव मयेकर याच्यासह अनोळखी सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री 12:45 च्या सुमारास घडली. संशयित मयेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Advertisement
Advertisement