For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पाण्यात चालणारी कार

06:22 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाण्यात चालणारी कार
Advertisement

अमेरिकेतील प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने आकाशात उडणारी कार निर्माण केली आहे. तर दुसरीकडे चीनच्या एका कंपनीने पाण्यात चालणाऱ्या कारची निर्मिती केली आहे. ही कार कोठेही खोल पाण्यात जरी अडकली, तरी ती बुडत नाही, तर पोहू लागते. अशा प्रकारे ती एखाद्या भूजलचर प्राण्याप्रमाणे काम करते. जीली नामक कंपनीने तिचे निर्माणकार्य केले आहे. या कारच्या मागच्या बाजूला 11.5 हॉर्स पॉवरचे दोन प्रोपेलर्स बसविण्यात आले आहेत. कार पाण्यात बुडू लागली तर हे प्रोपेलर्स किंवा पंखे कारला साधारणत: साडेसहा किलोमीटर प्रतितास या वेगाने पुढे नेऊ शकतात.

Advertisement

त्यामुळे कार बुडण्याऐवजी पाण्यावर तरंगते. पाण्यात काही धोकादायक वस्तू असतील, तर त्यांचा कारला त्रास होऊ नये, म्हणून कारमध्ये विशेष साधने बसविण्यात आली आहेत. पाण्यातही ही कार जास्तीत जास्त सुरक्षित रहावी, अशा प्रकारे तिची रचना करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार किमान 40 मिनिटे आणि जास्तीत जास्त दोन तास पाण्यावर चालू शकते. काहीवेळा पूर, अतिवृष्टी किंवा तत्सम कारणांमुळे पर्यटकांच्या कार्स अडकून पडतात. पाण्याचा जोर वाढला तर त्या बुडण्याचाही धोक असतो. तथापि, ही कार अशा धोक्यांपासून तिच्या प्रवासांचे संरक्षण करते. ती बुडत नसल्याने, बराच काळ खोल पाण्यात अडकलेले तिच्यातील प्रवासी सुखरुप राहू शकतात. मधल्या वेळात साहाय्याची मागणी करण्यासाठी त्यांना उसंत मिळते. तसेच ही कार पाण्यात पुढे जाऊ शकत असल्याने ती आता बसलेल्या माणसांना सुखरुपरित्या कोरड्या स्थानी घेऊन जाऊ शकते. या कारच्या निर्मितीचा उद्देशही वैशिष्ट्यापूर्ण आहे. ती पाण्यातून फिरण्याचा आनंद घेण्यासाठी बनविण्यात आलेली नाही. तर पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आहे. तिचा उपयोग आपत्कालीन बचाव कार्य करताना केला जाण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.