महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाइनद्वारे धावणारी कार

06:34 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जेव्हा आपण कार्सबद्दल बोलतो, तेव्हा सर्वसाधारणपणे आमच्या मनात पेट्रोल किंवा डिझेलद्वारे धावणाऱ्या वाहनांचे चित्र उभे राहते, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एका नव्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता काही कार्स या वाइनद्वारे धावत आहेत. वाइनद्वारे धावणाऱ्या कार्सचा विचार प्रथम एका संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत समोर आला.

Advertisement

वाइनमध्ये असलेले एथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे इंधनाच्या स्वरुपात वापरले जाऊ शकते. एथेनॉल एक नवीकरणीय स्रोत असून जो कृषि उत्पादने म्हणजेच ऊस, मका आणि द्राक्षाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. याच्या वापराद्वारे पारंपरिक जीवाश्म इंधनांवरील निर्भरता कमी करणे शक्य असल्याचे वेज्ञानिकांचे मानणे आहे.

Advertisement

वाइनमधून प्राप्त एथेनॉल एक नवीकरणीय साधन असून जे पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत एथेनॉल जाळल्याने कमी हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते. तसेच एथेनॉलमध्ये ऊर्जेची उच्च क्षमता असते, ज्यामुळे वाहनांना अधिक वेग प्राप्त होतो.

वाइनद्वारे धावणाऱ्या कार्समध्ये एथेनॉलला इंधनाच्या स्वरुपात वापरण्यासाठी काही तांत्रिक बदल करण्याची आवश्यकता असते. या कार्सच्या इंजिनला एथेनॉलसाठी खासकरून संशोधित केले जाते. याचा अर्थ इंजिनच्या काही भागांना मजबून करणे आणि इंधन प्रणालीत बदल करणे असतो. वाइनद्वारे निर्मित एथेनॉलला थेट टाकीत भरून वापरले जाऊ शकते. परंतु आधुनिक कार्समध्ये इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालीचा वापर केला जातो, ज्यामुळे एथेनॉलच्या मिश्रणाला योग्यप्रकारे सेट करता येऊ शकेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article